Share

‘विश्वनेता’ या एकाच शब्दात मोदींचे वर्णन करता येईल- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्व नेत्यांची भेट घेतली. परंतु इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि पंतप्रधान मोदी यांची भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान मोदींशी चर्चा करतांना नफ्ताली बेनेट म्हणाले की, तुम्ही इस्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहात, तुम्ही माझ्या पक्षात सामील व्हा.असे आवाहन त्यांनी केले.

इस्राएलच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींच्या त्यांच्या देशातील लोकप्रियतेची ग्वाही देऊन आपल्या पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. ‘विश्वनेता’ या एकाच शब्दात मोदीजींचे अचूक वर्णन करता येईल. असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदींशी चर्चा करतांना नफ्ताली बेनेट म्हणाले की, तुम्ही इस्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहात, तुम्ही माझ्या पक्षात सामील व्हा असे म्हटल्यावर पंतप्रधान मोदी हसायला लागले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांच्या औपचारिक भेटीनंतर संक्षिप्त चर्चा झाली. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लोक इस्रायलशी असलेल्या मैत्रीला खूप महत्त्व देतात. दोन्ही देशांमधील मजबूत द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी एकत्र काम करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!