🕒 1 min read
बीड :-पाथर्डी तालुक्याच्या सरहद्दीवर नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत मागील चार दिवसांपासून चांगलीच वाढली आहे. दि.२४ रोजी सुरुडी येथील नागनाथ गर्जे यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला पुन्हा शुक्रवारी दि.२७ या बिबट्याने तालुक्यातील किन्ही गावातील एका ९ वर्षीय मुलाची शिकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुरुडी व किनी येथे मानवी हल्ला केलेल्या बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झालेल्या असून त्यामध्ये औरंगाबाद ,अमरावती ,नांदेड व इतर 1 अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ असणाऱ्या टीमचा ही समावेश असून एकूण ८० कर्मचारी यात सक्रीय आहेत .
आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू असून , सहा पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले आहेत. उद्या आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. लवकरच यशस्वीपणे जेरबंद करू असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता भाजपने डोनाल्ड ट्रम्प यांना जरी प्रचाराला आणलं तरीही ते ही निवडणूक जिंकू शकणार नाहीत’
- ‘पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले…’
- केंद्र सरकार अखेर नरमलं,अमित शाह यांनी केले ‘हे’ आवाहन
- महात्मा फुलेंनी सुरू केलं होतं ते मिशन आगामी काळात आपण पूर्ण करू : चंद्रकांत पाटील
- ‘शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखं वागवलं जात आहे’ : संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
