हिंगोली : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असून त्यांनी विलगीकरणाचं कारण देत आठवड्याची मुदत मागितली आहे.
तर, भाजप वेगवेगळ्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयासह घरावर ईडीने छापा टाकला असता ते परदेशात होते. यांनतर, भारतात येताच त्यांनी संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांची भेट घेतली होती.
त्यामुळे, नितेश राणे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ईडीने सरनाईकांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यांनी क्वारंटाईन असल्याचे कारण देत आठवड्याभराची मुदत मागितली होती. ते परदेशातून आले असताना संजय राऊत व त्यांच्या बंधूंच्या भेटीला कसे गेले व ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे क्वारंटाईन करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या
- संधीचे सोने करेन…ललिता बाबर झाल्या माणगावच्या तहसीलदार
- ‘अजित पवारांवर लक्ष्य ठेवा असं अलीकडे सांगितलं जातंय, पण…’
- ‘लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत’ – पृथ्वीराज चव्हाण
- महात्मा फुलेंनी सुरू केलं होतं ते मिशन आगामी काळात आपण पूर्ण करू : चंद्रकांत पाटील
- बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी तब्बल सतरा पथके स्थापन

