तळेगाव दाभाडे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
कोरोना काळात झालेल्या टाळेबंदीनंतर राज्यात होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका असल्याने मतदार कसा प्रतिसाद देणार यासह २०१९ च्या निवडणुकांनंतर राज्यातील सत्तेसाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला जनता स्वीकारणार की इतर उमदेवारांना विजयी करणार यावरून उत्सुकता निर्माण झाली आहे.
काल, तळेगाव दाभाडे येथे महाविकास आघाडीतर्फे उमदेवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजपवर घणाघात केला. ‘ भाजपने मावळ तालुक्यातून घड्याळ व पवार मुक्त करण्याची स्वार्थी घोषणा केली. आता भाजपला पाहायला व ऐकायला नागरिकांना वेळ नाही. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी आपले उमेदवार आवश्यक आहेत.’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं.
महत्वाच्या बातम्या
- पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन : उदयनराजे भोसले
- ‘अजित पवारांवर लक्ष्य ठेवा असं अलीकडे सांगितलं जातंय, पण…’
- ‘लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत’ – पृथ्वीराज चव्हाण
- ‘संजय राऊतांच्या नातेवाईकांना देखील ईडीच्या नोटीसा’; नितेश राणेंचा दावा
- बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी तब्बल सतरा पथके स्थापन

