मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामागे महत्वाची भूमिका बजावलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सामना’तील लेखातून महाविकास आघाडीच्या सरकारबाबत विविध खुलासे केले आहेत.
आपल्या रोखठोख सदरात राऊत यांनी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त अनेक अंतर्गत विषयांवर भाष्य केलं आहे. ‘हे सरकार किती टिकेल यावर आजही प्रश्न निर्माण केले जात आहेत. त्यांनी अमित शहा यांचे एक प्रगल्भ विधान समजून घेतले पाहिजे. आघाडी सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील एखादा पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही.’ हेच सत्य आहे. यापैकी एकही पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मध्य प्रदेश किंवा राजस्थान पॅटर्न वापरायचा हे ठरवले, पण राजस्थान पॅटर्न फसला व मध्य प्रदेशात ‘सिंधिया’ पॅटर्न यशस्वी झाला.’ असं ते म्हणाले.
तर, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळय़ात जास्त भरवशाचे तेच आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कुरतडून काही हाती लागेल काय यावर ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे.’ असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संधीचे सोने करेन…ललिता बाबर झाल्या माणगावच्या तहसीलदार
- ‘पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले…’
- केंद्र सरकार अखेर नरमलं,अमित शाह यांनी केले ‘हे’ आवाहन
- महात्मा फुलेंनी सुरू केलं होतं ते मिशन आगामी काळात आपण पूर्ण करू : चंद्रकांत पाटील
- बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी तब्बल सतरा पथके स्थापन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
