Share

मनसेची पहिल्यांदाच मराठवाडास्तरीय बैठक; राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय डोस देणार?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबादः येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची औरंगाबाद शहरात महत्त्वपूर्ण बैठक आज होत आहे. या बैठकीसाठी मंगळवारी संध्याकाळी राज ठाकरे यांचे औरंगाबाद मध्ये आगमन झालेले आहे. तत्पूर्वी राज(Raj thackrey) ठाकरे औरंगाबाद मध्ये येण्यापूर्वी शहरभर मनसेने मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहेत. यामध्ये विशेषतः मुस्लिम बहुल भागात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये जय श्रीरामचा नारा दिलेले बॅनरचा चर्चा सुरू आहे. आता मनसे येणाऱ्या काळात हिंदुत्वाच्या जोरावर औरंगाबाद पालिकेच्या निवडणुका लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मराठवाडा स्तरावर एवढी मोठी बैठक पार पडत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आज होणाऱ्या बैठकीसाठी पंधराशे पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर(Sumit Khambekar) यांनी दिली. यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्हे आठही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मनसेची पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक होत आहे. त्याचबरोबर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आत्तापर्यंत मनसेने शहरात मोठी कामगिरी केलेली नाही. २०१० च्या महापालिकेत मनसेने पहिल्यांदाच खाते उघडले होते. त्यात राज गौरव वानखेडे हे नगरसेवक निवडून आले. मात्र नंतर ते भाजपवासी झाल्याने सध्या शहरात मनसेचा एकही माजी नगरसेवक उरलेला नाही. त्यामुळे येणारा काळात मनसे कशा प्रकारे मनपा निवडणुकीला सामोरे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्याचबरोबर आजच्या बैठकीत राज ठाकरे कार्यकर्त्यांना-पदाधिकाऱ्यांना काय डोस देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!