Share

मनसेने जिंकला मराठीचा लढा; तर न्यायालयाने कार्यकर्त्यांना सुनावली पोलीस कोठडीची सजा

Published On: 

मुंबई : ‘मराठी नाही तर ऍमेझॉन नाही’, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ऍमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर ऍमेझॉननं माघार घेत मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबर रोजी आक्रमक पवित्रा घेत खळखट्याक पॅटर्न वापरलं होतं.

पुण्यातील कोंढव्यातील ऍमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं. यानंतर, औरंगाबाद पाठोपाठ मुंबई देखील अनेक ठिकाणी ऍमेझॉन वेअर हाऊसवर हल्लाबोल केला होता. हा आक्रोश बघता ऍमेझॉनने आपली मुत्सद्देगिरी थांबवून नमतं घेतलं. त्यांनी त्याच रात्री आपली सेवा लवकरच मराठी मध्ये येत असल्याचा वेबसाईटवर खुलासा केला होता.

दरम्यान, २५ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या तोडफोडीप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केलं. याप्रकरणी अंधेरी न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज ठाकरेंना नोटीस बजावल्यामुळे मनसे अधिक आक्रमक !

या वादाप्रकरणी ऍमेझॉनने न्यायालयात धाव देखील घेतली होती. यानंतर, दिंडोशी न्यायालयाने याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली. हे समजताच मुजोर ऍमेझॉनला धडा शिकवण्यासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, फ्लिपकार्टला मात्र वेळीच शहाणपण आल्याचं दिसून आलं होतं. मनसेसोबत संघर्ष सुरु होण्याआधीच ऍमेझॉनची मुख्यस्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने मराठी स्वीकारल्याचं दिसून येत आहे. आता ऍमेझॉन देखील लवकरच मराठीमध्ये उपलब्ध होणार असल्याने मनसेच्या लढ्याला यश आल्याचं समाधान देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!