🕒 1 min read
नवी दिल्लीः सध्या नवीन वर्ष आणि सनासुदींच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर आणि डिस्काउंट दिले जात आहेत. यामध्ये नुकताच फ्लिपकार्ट या शॉपिंग प्लट फॉर्मने ग्राहकांसाठी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने ईयर एन्ड सेलचे आयोजन केले आहे. या नवीन सेलचे नाव फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स २०२० सेल आहे. या सेलची सुरुवात २६ डिसेंबर पासूनझाली होती हा सेल २८ डिसेंबर पर्यंत चलला होता.
त्यानंतर आता पुन्हा फ्लिपकार्टवर आजपासून फ्लिपकार्ट रिअलमी डेज सेलला सुरुवात झाली आहे. हा सेल ९ जानेवारी पर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्ट रियलमी डेज २०२१ सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये रिअलमी X3 आणि नार्झो 20A सह अनेक दुसऱ्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जाणार आहे.
फ्लिपकार्ट रियलमी डेज सेल २०२१ मध्ये रियलमी ६ ला १६ टक्क्यांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. तर रियलमी ७, ७ प्रो आणि रियलमी ७ आय वर अनुक्रमे १६ टक्के, ४ टक्के, आणि १३ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय रियलमी सी १५ एसला १६ टक्क्यांच्या सूटसोबत खरेदी करता येवू शकते.
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये रियलमी सी ११ ला ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तर रियलमी सी १२ ला ८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या सेलमध्ये रियलमी नार्जो २० सीरीजच्या स्मार्टफोन्सवर रियलमी नार्जो २०, नार्जो २० ए, नार्जो २० प्रो वर अनुक्रमे १० हजार ४९९ रुपये, ८ हजार ४९९ रुपये आणि १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.
रियलमी डेज २०२१ सेलमध्ये प्रीमियम रियलमी एक्स ३ सीरीजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. याच्या सुपर झूम व्हेरियंटवर मोठी सूट मिळणार आहे. रियलमी एक्स सुपरझूम २३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.
तर रियलमी एक्स३ ला २१ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. रियलमी एक्स ५० ५जी ला ३१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर तसेच ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! परीक्षेविना प्रशासकीय नोकरी मिळवण्याची संधी रेल्वेमध्ये १००४ पदांची भरती
- कोरोनाचा कहर : ‘या’ देशात करण्यात आली संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने एकदा नाही तर दोनदा नामांतराचा प्रस्ताव फेटाळला’
- राष्ट्रवादीचा भाजपला जबर धक्का; नवी मुंबईतील मातब्बर नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
- नियमाचे उल्लंघन केल्याने रोहितसह पाच खेळाडूंची माजी क्रिकेटरने ट्विटरवर घेतली शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
