Share

MNS । फक्त चार खासदार, तरी वाजवतात बाजा, पोरीपुरताच उरलाय, साडेतीन जिल्ह्याचा राजा; मनसेचा टोला

Published On: 

मुंबई : दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून अजित पवार निघून गेले. त्यामुळे ते नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. वक्ता म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच अजित पवार मंचावरून निघून गेले. आता नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी यापूर्वी अजित पवारांनी बंडखोर वृत्ती दाखवली आहे. अशातच व्यासपीठावर शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवारांची ही भूमिका मोठे आव्हान म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे पक्षात फूट पडण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादीत वेगाने सुरु असलेल्या या घडामोडींवर मनसेने टीका केली आहे. यावेळी मनसेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच अप्रत्यक्ष्य टीकास्त्र सोडलंय. मनसेचे संभाजीनगरचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मंगेश साळवे यांनी फेसबुकवर पोस्ट करत टीका केलीये. पोस्टमध्ये मंगेश साळवे म्हणाले कि, फक्त चार खासदार, तरी वाजवतात बाजा, पोरीपुरताच उरलाय, साडेतीन जिल्ह्याचा राजा. असं म्हणत जोरदार टोला लगावला आहे.

नेमकं राष्ट्रीय अधिवेशनात काय झालं होत?

शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित पवार भाषण करतील, असे पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. पण तो स्टेजवरून अशा रीतीने उठले की परत आलेचं नाहीत. अजित पवार वॉशरूममध्ये असल्याचे मंचावरूनच सांगण्यात आले. मात्र उशिरापर्यंत ते आले नाहीत आणि ते परतले तेव्हाही शरद पवार यांचे समारोपाचे भाषण सुरू होते. अजित पवार मंचावरून उठताच त्यांच्या समर्थकांनीही घोषणाबाजी केली. त्यांच्या या भूमिकेकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. नाराज अजित पवारांचे मन वळवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्या चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अजित पवारांची ही भूमिका राष्ट्रवादीला तणावात टाकणारी आहे, कारण त्यांनी यापूर्वी बंडखोरी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथही घेतली आहे. दोघांनीही सकाळीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण 80 तासही सरकार चालू शकले नाही. आजही त्यांचे फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्याचे बोलले जाते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!