Share

MNS | “मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मंगळवारी शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीकेबाजी केली होती. एवढंच नाहीतर राज ठाकरेंचा पुन्हा एकदा ‘मुन्नाभाई’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी खोचक टोलाही लगावला होता. अशातच ठाकरेंच्या या वक्तव्याला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले गजानन काळे ?

उद्धव ठाकरे यांचा ‘मामू’ म्हणून उल्लेख करत गजानन काळे यांनी ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. यासंदर्भात काळे यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे.

त्याचबरोबर 2012 ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या 7 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू

उद्धव ठाकरेंनी काय केली होती टीका ?

दरम्यान, आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई पालिका जिंकण्यासाठी स्वत: पंतप्रधान उतरत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गृहमंत्री आहेतच. आपले गद्दार आहेतच. मुन्नाभाईही आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!