🕒 1 min read
सोशल नेटवर्किंग साइट ‘इंस्टाग्राम’ गुरुवारी संध्याकाळी जगभरातील लाखो वापरकर्त्यांसाठी बंद झाली. जगभरातील इंस्टा वापरकर्त्यांना या सेवेत लॉग इन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. DownDetector ने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम गुरुवारी रात्री 9:32 च्या सुमारास डाऊन झाले आणि त्याची सेवा बराच काळ ठप्प झाली, त्यामुळे इंस्टाग्राम वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. Downdetector च्या अहवालानुसार, 66 टक्के लोकांना ॲप क्रॅश होण्याच्या समस्या येत होत्या, तर 24 टक्के लोकांना सर्व्हर कनेक्शनमध्ये लॉग इन करण्या समस्या येत होत्या.
Downdetector च्या मते, Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवरील इंस्टाग्राम ॲपमध्ये या समस्या नोंदवण्यात आल्या होत्या, तर काही वापरकर्त्यांनी सांगितले की त्यांना प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. याव्यतिरिक्त, काही इंस्टाग्राम वापरकर्त्यांना स्टोरी ओपेन करणे, थेट मेसेज पाठवणे आणि प्राप्त करणे किंवा त्यांच्या फीडवर नवीन पोस्ट लोड करण्यात अडचणी येत होत्या.
मात्र, यानंतर इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने ही समस्या दूर केली. परंतु जोपर्यंत सेवा बंद होती तोपर्यंत वापरकर्त्यांनी ट्विटरवर मीम्सचा पूर आणला होता. ट्विटरवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर करायला सुरुवात केली. यासोबत #InstagramDown हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. इंस्टाग्रामने नंतर ट्विटरवर पोस्ट केले की, आजच्या समस्येचे आम्ही निवारण केले आहे, आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
*Me trying to open Insta again and again #instagramdown pic.twitter.com/klMCmrbquQ
— Ignored_Inayat (@inayomeister) September 22, 2022
Instagram every other day. #instagramdown pic.twitter.com/NemQdbiXsk
— Prayag (@theprayagtiwari) September 22, 2022
Everyone coming to twitter seeing Instagram and Facebook are down #facebookdown #instagramdown pic.twitter.com/Tkfp3Ta0gq
— Elliot ???? (@lfceIliot) October 4, 2021
https://twitter.com/memeisduniya/status/1572991251758346240?s=20&t=2LU0GkUcWGs13BjpHYPN-A
महत्वाच्या बातम्या
- Shivsena : शिवाजी पार्कबाबत आज हायकोर्टात युक्तिवाद, शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा? आज निर्णय!
- Bank Of Baroda Recruitment | बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती
- Dada Bhuse | “बाळासाहेबांना कुटुंबाच्या चौकटीपुरते मर्यादित करू नका”
- Nitesh Rane | “विनायक राऊत 12 खासदारांसह शिंदे गटात यायला तयार होते, पण…”; नितेश राणेंचा दावा
- BJP | “…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
