Share

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचे प्रत्युत्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी आव्हान दिलं होतं. जो पर्यंत राज ठाकरे उत्तर प्रदेशच्या लोकांची हात जोडून जाहीर माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना मनेसेनं प्रत्युत्तर दिले आहे. मनसे अश्या छोट्या-मोठ्या धमक्यांना भीक घालत नाही असे, प्रत्युत्तर आता मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी दिले आहे.

पानसे म्हणाले की, बृजभूषण सिंह यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेला आहे. त्यामुळे ते आता शांत होतील. मात्र, धमकी कुणी दिली हे महत्त्वाचे नाही. मनसे, महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे सैनिक आणि स्वतः राज ठाकरे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही, असे पानसे म्हणाले. राज ठाकरेंबद्दल बोलल्यानंतर प्रसिद्ध मिळते अशी सिंह यांना वाटत असेल त्यामुळेच ते प्रसिद्ध झालेले आहेत. मात्र त्यांनी दिलेल्या या आव्हानानंतर योगी आदित्यनाथ यांचा सिंह यांना फोन गेला असून त्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसेच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल आणि त्यांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी असे विधान भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केले होते. तसेच माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!