🕒 1 min read
मुंबई : सामना आग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना खापरफोडे या नावाने संबोधलं आहे. तसेच शिंदेंना महाराष्ट्रातला शेती उद्योग खतम करायचा असून त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचं असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे. यावरुन भाजप सोबत जवळीक वाढवत असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनी सामनातून सावध केलं आहे.
सामना मधून राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी केलं सावधः
राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांना सावध करण्यात आलं आहेत
मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणच्या भाडोत्री सभेत वल्गना केली की, शिवसेनेने मराठी माणसाचे नुकसान केले. अर्थात मुंबईतून मराठी माणूस कमी का झाला, या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनीच दिले आहे, सामनातून म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाः
दरम्यान, श्री. फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला. उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे. ‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो, असं देखील सामना मध्ये म्हटलं आहे.
महतवाच्या बातम्याः
- Electric Scooter Hacks | इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर…
- Uday Samant | वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाच कसा?, उदय सामंतानी सांगितला घटनाक्रम
- Samna | “मा.मु. श्रीमान खापरफोडे, फाॅक्सकाॅन प्रकल्प का गेला?”, सामनातून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- Devendra Fadnavis । जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते – देवेंद्र फडणवीस
- Nude Photoshoot प्रकरणी रणवीर सिंगचा जबाब! म्हणाला, “फोटोसोबत छेडछाड…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
