Share

Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांना उपनेत्यांची यादीतून देखील वगळलं, शिंदे गटाकडून 26 उपनेत्यांची यादी जाहीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मंत्री पदाचा विस्तार करण्यात आला होता. मात्र यावेळी औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना एकही मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केली होती. अशातच एकनाथ शिंदे गटाकडून उपनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या यादीतून देखील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना वगळण्यात आलं आहे.

शिंदे गटाकडून 26 जणांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करून संजय शिरसाट यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र ती न मिळाल्याने त्यांनी अनेक वेळा जाहीर नाराजगी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी सप्टेंबर मध्ये होणाऱ्या उपनेते नेत्यांच्या यादीमध्ये त्यांचे देखील नाव शिंदे घेतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली होती. मात्र याही वेळेस त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने आता ते काय बोलतील याकडे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

संजय शिरसाट हे शिंदे गटातील महत्त्वाचे नेते आहेत. मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार त्यांना मान्यात येत होतं. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं असून संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाची संधी हुकली आहे.

दरम्यान, मंत्री पद न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी अनेक वेळा उघडपणे आपली नाराजगी बोलून दाखवली होती. याच गोष्टीचा त्यांना हा फटका बसला असल्याचं आता म्हटलं जात आहे. तसेच संजय शिरसाट यांना उपनेतेपदाच्या यादीतून वगळण्यात आल्यामुळे हा त्यांना मोठा धक्का मानण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!