औरंगाबाद : दौलताबाद येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलने मराठी माध्यम विभागाच्या नववी आणि दहावींचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकांनी दिली. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शाळा व्यवस्थापनाला अशा प्रकारे कोणतेही वर्ग बंद करण्याचा निर्णय घेऊ देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
दौलताबाद येथे महाराष्ट्र पब्लिक स्कुल आहे. या ठिकाणच्या शाळा व्यवस्थापणाने नववी आणि दहावीचे मराठी माध्यम विभागाचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पालकांनी तीव्र विरोध केला. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांना ही बाब माहित झाल्यावर त्यांनी शाळेत धाव घेतली. मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने शाळेत धडक मारली. शाळेसमोर जमलेल्या सर्व पालकांसोबत चर्चा करून शाळेच्या या आडमुठी निर्णयाचा विरोध केला.
शाळा अशा प्रकारे कोणतेही वर्ग बंद करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही आणि जर व्यवस्थापणाने जबरदस्ती केली अथवा विद्यार्थ्यांना न मागताही टीसी देत असेल तर मनसे पालकांसोबत शाळेविरोधात लढा देण्यास खंबीर आहे असा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापनाला लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे शिक्षक सेनेचे राज्य सचिव सुभाष मेहेर, बिजू मारक, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, अशोक म्हस्के पाटील, मच्छिंद्र मोरे, सागर कुंटे, अनिकेत ठोकळ, नागेश देशमुख, राजेश इंगळे यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. दरम्यान, या मुद्द्यावर शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
महत्वाच्या बातम्या
- हिंगोलीत पेट्रोलची शंभरी भरली, कोरोनाच्या संकटात महागाईचा चटका
- माणुसकीचा ‘विजय’! कोणीही जवळ नसलेल्या आजीला उचलून नेत केले दवाखान्यात दाखल
- मोठी बातमी! ‘औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा देणार’, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
- आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार


