Share

हिंगोलीत पेट्रोलची शंभरी भरली, कोरोनाच्या संकटात महागाईचा चटका

Published On: 

हिंगोली : देशासह राज्यात पेट्रोलच्या दराने भडका उडाला आहे. आंतरराष्ट्रीय इंधनाचे दर घटले असताना देखील केंद्र व राज्य सरकारच्या विविध करामुळे सातत्याने इंधन दरात वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी इंधनाचे दर स्थिर होते. तर काही त्यात घट देखील झाली होती. मात्र काही राज्यात झालेल्या निवडणूकानंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज, मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलीटर २४ ते २७ पैशांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमत २७ ते ३१ पैसे प्रति लीटरनं वाढवण्यात आली आहे

मराठवाड्यातील हिंगोलीत पेट्रोलची किमत शंभर रुपये १५ पैसे प्रतिलिटर झाली. मागच्या काही दिवसापासून पेट्रोलच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. यामुळे सर्वसाधारण वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या किमतीने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसत आहे. त्यामुळे हिंगोलीत पेट्रोलची किमत प्रतिलीटर १००. १५ तर डिझेलची किंमत ९९. ६० पैसे प्रति लीटर झाली आहे. या दर वाढीचा चांगलाच फटका सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे.

पेट्रोलचे प्रतिलीटर दर
दिल्ली – 92.85
मुंबई – 99.14
कोलकाता – 92.92
चेन्नई – 94.54

डिझेलचे प्रतिलीटर दर
दिल्ली – 83.51
मुंबई – 90.71
कोलकाता – 86.35
चेन्नई – 88.34

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!