मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळू शकलेला नाही. यामुळे लोकल प्रवास, लसीकरण याच्यापासून त्यांना वंचित राहवे लागले आहे. अन्य अत्यावश्यक सेवांप्रमाणे पत्रकारांनाही वार्तांकनासाठी फिरावे लागते. मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड, ओडिसा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केले आहे.
यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पत्रकार आणि औषध विक्रेत्यांना कोविड योद्ध्यांचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
ट्विटद्वारे ते म्हणाले की, ‘औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा देणार, कोविडयोद्धे म्हणून लसीकरणालाही प्राधान्य देणार, कोरोना महामारीशी सुरू असलेल्या लढाईत महत्त्वाचा घटक असलेल्या महाराष्ट्रातील औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’
औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा देणार
कोविडयोद्धे म्हणून लसीकरणालाही प्राधान्य देणार
कोरोना महामारीशी सुरू असलेल्या लढाईत महत्त्वाचा घटक असलेल्या महाराष्ट्रातील औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. pic.twitter.com/Rhm3HxBfjD— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) May 18, 2021
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहिलं असून त्यात पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच देशभरात अनेक राज्यांनी पत्रकार आणि कॅमेरामनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आल्याकडेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘टुलकिटद्वारे पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा डाव’
- आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
- ‘केंद्राने दिलेले तकलादू व्हेंटिलेटर सुरू करून दाखवाच’, काँग्रेसचे फडणवीसांना थेट आव्हान
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
- जन्म-मृत्यू एकत्रच! जुळ्या भावांचा कोरोनामुळे सोबतच मृत्यू
- ‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची आता दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

