बीड : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची एवढी भीती वाढली आहे की रुग्णांचे नातेवाईकही रुग्णांच्या जवळ जात नाहीत. त्यामुळे वृद्धांना, बेघरांना उपचारासाठी जाण्यात मोठी अडचण होत आहे. पण या संकटाच्या काळातही काही जण रक्ताच्या नव्हे तर माणुसकीच्या नात्याने मदत करत आहेत. त्यापैकीच एक आहेत पाटोदा तालुक्यातील विजयसिंह बांगर.
विजयसिंह बांगर हे गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक भावनेतून कोरोनाग्रस्तांना मदत करत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास पात्र आहे. मात्र, त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील नाळवंडी गावातील एका कुटुंबाचे सर्व सदस्य कोरोनाबाधित असल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल आहेत. पण त्या कुटुंबातील एक आजी घरी एकट्याच होत्या. घरातील सदस्य कोरोनाबाधित असल्याने अनेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपासून अन्नपाण्यावाचून वंचित राहावे लागले. कोरोनाच्या भीतीने त्यांच्या आसपास जाण्याचे धाडसही कोणी केले नाही.
https://www.facebook.com/VijaySinghBalaBangar/videos/371969520918366/
ही माहिती सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांना मिळाली. त्यांनी त्याठिकाणी धाव घेत आजींना रुग्णालयात नेले. आजींचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना न्युमोनियाचे निदान झाले असून त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरुयेत. हा प्रकार त्यांनी फेसबूकवर पोस्ट केला आहे. प्रसिद्धीसाठी नव्हे तर इतरांनी आदर्श घेऊन समाजसेवा करावी अशी त्यांची भावना आहे.
विजयसिंह हे हे गेल्या एक वर्षापासून रुग्णांची सेवा करत आहेत. ते पाटोदा तालुक्यात मागील एका वर्षापासून चार गाड्याद्वारे रुग्णांना सेवा देत आहेत. आतापर्यंत त्यांनी एक हजारांहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल केलेय. तसेच ५०० पेक्षा जास्त लोकांना HRCT टेस्ट म्हणजे सिटी स्कॅन करण्यासाठी आर्थिक मदतही केली आहे. त्यांच्या या कार्याचे कौतूक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! ‘औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा देणार’, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
- ‘टुलकिटद्वारे पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा डाव’
- आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
- ‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची आता दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

