नवी दिल्ली: भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली होती. फ्रान्स ते भारत या प्रवासात अबू धाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर ही विमाने एकदिवस थांबली होती. १० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली. आता भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आणखी तीन विमानं येणार आहेत. त्यामुळे अर्थातच भारतीय वायुदलाची ताकद आणखी वाढणार आहे.
आज संध्याकाळपर्यंत ही विमानं भारतीय वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली असतील. सकाळी फ्रान्सहून ही तीन राफेल विमानं उड्डाण करतील आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत भारतात पोहचतील असं सूत्रांनी सांगितलं आहे. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमानं आल्याने वायुदलाचं बळ वाढणार आहे.
हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र, मिटिऑर हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम, ज्याची रेंज आहे १५० किमी असेल, स्काल्प हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम, ज्याची रेंज आहे ३०० किमी आहे, तर या राफेलची लांबी १५.३० मीटर आहे, तर रुंदी १०.८० मीटर आहे. राफेलची उंची १०.८० मीटर आहे इंधन क्षमता ४ हजार ७०० किलो आहे. राफेलचा वेग २१३० किमी प्रतितास आहे राफेलचं शस्त्रांसह वजन १५ हजार किलो आहे. अशी या विमानांची खासियत आहे. भारतीय वायुदलाची ताकद या विमानांमुळे वाढणार यात शंकाच नाही. एकूण ३६ विमानांपैकी पाच विमानं जुलै महिन्यात भारतात आली. आता तीन विमानं बुधवारी भारतात येणार आहेत.
तर काही दिवसांपूर्वी प्रेषितांचे कार्टून दाखवल्यानंतर फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या झाली हाेती. त्यानंतर फ्रान्समध्ये व्यापक निदर्शने करण्यात आली होती. शिक्षकाची हत्या हा दहशतवादी हल्ला असल्याचे वक्तव्य मॅक्राॅन यांनी केले हाेते. या घटनेवर भारतातून देखील प्रतिक्रिया उमटल्या त्यामुळे फ्रान्सकडून करण्यात आलेल्या या राफेल विमानांच्या खरेदीवर बहिष्कार टाकण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात येत होती.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- …तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचं काही नेत्यांचं षडयंत्र; ओबीसी समाज आक्रमक


