मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाचे सावट असले तरी होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मग बॉलिवूड कसे मागे राहिल? बॉलिवूड सेलिब्रिटीही होळीच्या मस्तीत धूंद आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा कदाचित चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचे व्हिडिओही चाहत्यांनी खूप पसंतीस उतरत असतात. होळीच्या निमित्ताने जेनेलियाने रितेशबरोबर तिचा एक रोमँटिक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलियाने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
https://www.instagram.com/p/CM_Y3I2jOzN/?utm_source=ig_web_copy_link
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा इंडस्ट्रीमधील सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. या दोघांचा हा व्हिडिओ पाहून चात्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशलवर चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठी कलाकार झाले रंगात बेधुंद ; जोडीदारासोबत पहिलीच होळी
- ‘अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही’
- भारताचा स्टार गोलंदाज आयपीएलसाठी सज्ज…
- राज्यातले महा वसुली आघाडी सरकार लवकरच अग्नीत जळून भस्मसात होईल – आचार्य भोसले
- ‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार,त्यांना लवकर बरं वाटू दे’


