🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्या नेत्यांला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याच्या मानसिक तणावामधून एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण चौगुले असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर टीका केली आहे. प्रवीण चौगुले हा महाराष्ट्र सैनिक भाजपच्या भिकारड्या राजकारणाचा बळी ठरला, महाराष्ट्र सैनिकांचे तळतळाट तुम्हाला लागल्या शिवाय राहणार नाहीत अशी टीका देशपांडे यांनी ट्विटवर केली आहे. दरम्यान सर्व सहकाऱ्यांनी संयम बाळगावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
प्रवीण चौगुले हा महाराष्ट्र सैनिक भाजप च्या भिकारड्या राजकारणाचा बळी ठरला महाराष्ट्र सैनिकांचे तळतळाट तुम्हाला लागल्या शिवाय राहणार नाहीत माझी सर्व सहकार्यांना विनंती आहे त्यांनी संयम बाळगावा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 21, 2019
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये आता ठाण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवीण चौगुले नावाच्या तरुणानं स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सगळीकडे निष्ठेची विष्टा होतानाही मनसैनिक स्वामीनिष्ठा दाखवतायत
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसैनिक दाखवत असलेल्या पक्ष निष्ठबद्दल कौतुक केले आहे. एका बाजूला राज्यामध्ये सगळी कडे निष्ठेची विष्टा होताना दिसत असताना एक मनसैनिक निष्ठा दाखवत आपल्या नेत्यांसाठी आत्महत्या करतो, आत्महत्या करणे चूकच आहे. पण ह्या युगात इतकी स्वामीनिष्ठा, सलाम प्रवीण चौगुले, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
सगळी कडे निष्ठेची विष्टा होताना दिसत असताना एक मनसैनिक निष्ठा दाखवत आपल्या नेत्यांसाठी आत्महत्या करतो
आत्महत्या चूकच
पण ह्या युगात इतकी "स्वामीनिष्ठा"
सलाम "प्रवीण चौगुले"
नशीबवान @RajThackeray@mnsadhikrut
.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 21, 2019
महत्वाच्या बातम्या
-
मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे
-
सत्ता आल्यावर सत्ताधाऱ्यांना पळता भूई थोडी करू : धनंजय मुंडे
-
महापुरामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची गरज नाही : शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
