Share

महापुरामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची गरज नाही : शरद पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी वेळ मिळावा म्हणून आगामी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याविषयी मोठ विधान केले आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आता वेळ घालवून चालणार नाही. राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लवकर निर्णय व्हावेत असं विधान केले. तसेच पुढे बोलताना ‘महापूर हा तीन जिल्ह्य़ातील प्रश्न आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याची निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना राज्य सरकारने महापूर आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. मात्र महापुरामुळे झालेलं नुकसान मोठं आहे ही मदत पुरेशी नाही. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्याने राज्याच्या मागणीप्रमाणे केंद्राने अर्थसाहाय्य करावं. गरज पडली तर कर्ज काढूनही मदत केली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!