टीम महाराष्ट्र देशा : मुंबईतील रेल्वे स्थानकावर सामान्य प्रवाशांना रोजचं सहन करावा लागणाऱ्या त्रासाचा खासदार सुप्रिया सुळे यांना देखील सामना करावा लागला आहे. सुळे या दादर रेल्वे स्थानका दरम्यान ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. आपल्या टॅक्सीमध्ये बसावं म्हणून एका एजंटने त्यांचा रस्ता अडवत गैरवर्तन केले. सुळे यांनी ट्विटकरत रेल्वे मंत्रालयाकडे याची तक्रार केली आहे.
Witnessed a strange experience at Dadar Station. A man by the name of Kuljit Singh Malhotra entered the train and was touting for Taxi service. Despite a refusal twice he blocked my path, harassed me and shamelessly even posed for the photo. (1/3)
— Supriya Sule (@supriya_sule) September 12, 2019
दरम्यान, मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी ‘सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या, एकही टॅक्सीवाला किंवा दलाल रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही’, असं म्हंटल आहे. नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांचा अवधी देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने टॅक्सी दलालांवर कारवाई न केल्यास आपल्या स्टाईलने प्रश्न सोडवण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईत रोज रेल्वे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्मवरती टॅक्सी चालक आणि त्यांचे दलाल ट्रेन मध्ये जबरन घुसून महिला-पुरुष प्रवाशांना त्रास देत असतात तेही बिना लायसेन्स, बिना तिकीट बिना परवाना रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून बिनदास्त दिवस-रात्र आपले सावज शोधत असतात, आणि रेल्वे पोलिसांना आणि इतर विभागांना त्याचा मोबदला म्हणजेच हप्ता मिळतो.
दलाल आणि टॅक्सी चालक प्लॅटफॉर्मवर येणार नाहीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीचं जागे व्हावे नाहीतर. आम्हीं रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलो आणि दलाल सापडले तर मात्र त्यानंतरची जवाबदारी तुमची राहील. जिथे जिथे महिलांच्या मानसन्मानाला ठेच पोचेल तिथे तिथे अशा समाजकंटकांना सोडणार नाही, असा इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला आहे.
https://www.facebook.com/nitinnandgoankar/videos/770406236744132/
महेंद्रसिंग धोनी निवृत्ती कधी घेणार; बीसीसीआयचे स्पष्टीकरण
मोदींचा ‘हा’ गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतो : अमित शाह
मोदींचे अपशकुनी पाय इस्त्रोमध्ये लागल्यानेचं संशोधकांसाठी दुर्भाग्य – कुमारस्वामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

