🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारताचा माजी कर्णधार आणि लोकप्रिय खेळाडू एम. एस. धोनी गुरुवारी निवृत्त होणार असल्याची बातमी समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली होती.. मात्र ही माहिती खरी आहे की खोटी याबाबत शंका होती. कारण सध्याचा कर्णधार विराट कोहली याने याबाबतचे ट्विट केले असल्याचे सांगितले जात होते.
बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची बातमी पूर्णपणे चुकीची आहे अशी माहिती दिली आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीसंदर्भातल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, विराट कोहलीने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो धोनीपुढे झुकून त्याचा सन्मान करत असल्याचं दिसतंय. या माणसाने त्या दिवशी मला असं काही धावायला लावलं होतं की मी फिटनेस टेस्ट देत होतो जणू… स्पेशल नाईट… त्या दिवशीचा खेळ मी कधीच विसरणार नाही!, असे विराटने लिहिले आहे.
MSK Prasad, Chief Selector: No update on MS Dhoni's retirement, the news is incorrect. pic.twitter.com/uLbzVdfmuf
— ANI (@ANI) September 12, 2019
परंतु निवड समितीचे प्रमुख एम एस के प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्ती संबंधीची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले असल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याचे योगदान भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे आहे.
दरम्यान गेले अनेक दिवस एमएस धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र धोनीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वन डे आणि टी20 क्रिकेट धोनी खेळतो आहे. आता या दोन प्रकारांतूनही तो लवकरच निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.
- फिरोज शहा कोटला मैदानाला आजपासून अरुण जेटलींचे नाव
- अधिकाऱ्याला हटवण्यासाठी नगरसेविकेने दिली आत्महत्येची धमकी, सभागृहाच्या भिंतीवरच आपटले डोके
- आमच्याही संपर्कात भाजप शिवसेनेचे काही नेते, लवकरचं नाव घोषित करणार : जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

