Share

मोदींचे अपशकुनी पाय इस्त्रोमध्ये लागल्यानेचं संशोधकांसाठी दुर्भाग्य – कुमारस्वामी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: भारतासाठी महत्वाकांक्षी असणाऱ्या ‘चंद्रयान २’ चे विक्रम लॅडर चंद्रावर उतरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या कार्यालयात असल्याने अपशकून झाला. मोदींचे अपशकुनी पाय इस्त्रोमध्ये लागल्यानेचं संशोधकांसाठी दुर्भाग्य ठरले, असे विधान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे.

कुमारस्वामी म्हणाले की, जसे काय मीच चांद्रयान-2 चंद्रायवर लॅण्ड करणार आहे असा संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूला आले होते. या मोहिमेसाठी संशोधकांनी तब्बल 10 ते 12 वर्ष कठोर मेहनत केली. परंतु मोदी फक्त प्रचाराच्या दृष्टीने आले होते. त्यांनी इस्रोमध्ये पाय ठेवला आणि तो क्षण संशोधकांसाठी दुर्भाग्याचा ठरला.

भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात संशोधकांना अडचणी निर्माण झाल्या. विक्रमसोबतचा संपर्क तुटल्यानं इस्रोसह देश निराश झाला. लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के धक्का बसला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र 95 टक्के काम सुरू राहणार आहे. ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!