Chitra Wagh | मुंबई : राज्याचे कृषमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केली होती. यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं. यावरुन अनेक नेत्यांनी आक्रमक भूमीका घेतल्या. अशातच भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना टोला लगावला आहे.
महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत, सप्ना पाटकर, नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात आला होता, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान होत नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही काय सांगाल? असं अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिलीय. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं असल्याचा हा व्हिडीओ आहे.
महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG T20 WC | मोठे फटके मारणारा सूर्याही आऊट, भारताने इंग्लंडविरुद्ध 3 विकेट गमावल्या
- Sania Mirza & Shoaib Malik Divorce | 12 वर्षाच्या संसारानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट
- IND vs ENG T20 WC | भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा झेलबाद! ‘सुर-विर’ची जोडी मैदानावर
- IND vs ENG T20 WC | केएल राहुल फ्लॉप, रोहित-विराटचा पलटवार, पॉवरप्लेमध्ये ३८ धावा
- IND vs ENG T20 WC | केएल राहुल पुन्हा फ्लॉप, सेमीफायनलमध्ये 5 धावा करून बाद, भारताला पहिला धक्का


