🕒 1 min read
Uddhav Thackeray । मुंबई : पत्राचाळ (Patrachawl Scam) घोटाळ्या प्रकरणी तब्बल १०२ दिवस अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा अखेर जामीन झाला आहे. यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका करत केंद्रसरकारवर देखील चांगलाच निशाणा साधला.
केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्या अंगावर जा म्हटलं त्यांच्या अंगावर जातात. बेकायदेशीरपणे वागत असल्याचे संपूर्ण देशाने, जगाने बघितले आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली.
ते म्हणाले, या तपास यंत्रणांच्या विरोधात आपचे लोकंही लढत आहेत. तेलंगणाच्या लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रकरणच बाहेर आणलं आहे. सोरेन आणि ममता दीदींना छळलं जात आहे. हे सर्व एकत्र झाले तर किती मोठी ताकद उभी राहील, याची ताकद त्यांना माहीत नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.
पुढे ते म्हणतात, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही न्यायदेवता आपल्या ताब्यात घेतात की काय अशी वक्तव्य केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांची आहेत. त्यांनी न्यायदेवतेवर शंका उपस्थित केली आहे. एकूणच सर्व सामान्यांच्या आशेचा किरण हे न्यायालये असतात आणि न्यायलय जर आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल, तर देशातल्या तमाम जनतेने त्याचा विरोध पाहिजे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान,यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठा दावा केला आहे. “न्यायालयाने केंद्र सरकारला काल दणका दिलेला असतानाही कदाचित खोट्या केसमध्ये संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण चपराक दिल्यानंतरही लाज वाटण्याइतकं सरकार संवेदनशील असतं तर अशा घटना घडल्या नसत्या,” असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Chitra Wagh | अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला…
- Uddhav Thackeray । “दिवस बदलतात हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं”; उद्धव ठाकरेंचा इशारा
- IND vs ENG T20 WC | मोठे फटके मारणारा सूर्याही आऊट, भारताने इंग्लंडविरुद्ध 3 विकेट गमावल्या
- Sania Mirza & Shoaib Malik Divorce | 12 वर्षाच्या संसारानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट
- IND vs ENG T20 WC | भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा झेलबाद! ‘सुर-विर’ची जोडी मैदानावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

