Share

अ‍ॅमेझॉन नंतर मनसेची डॉमिनोजला नोटीस

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठीच्या मुद्यावर अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर आता  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चा पिझ्झा आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

डॉमिनोजच्या प्रशासनाने मनसेच्या या मागणीची दखलही घेतली आहे. आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन डॉमिनोजने मनसेला पत्राद्वारे दिले आहे.

काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन या शॉपिंग कंपनीच्या सेवांमध्ये मराठी भाषेच्या समावेशाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद फारच चिघळला होता. याप्रकरणात ॲमेझॉनने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती.

त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अखेर मनसेच्या दणक्यापुढे अॅमेझॉनला नमते घ्यावेच लागले. अखेर अमेझॉनने नमते घेत लवकरच मराठी मध्ये येत असल्याचा ॲमेझॉनचा वेबसाईटवर खुलासा केला आहे.

अ‍ॅमेझॉन, स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!