Share

सुहास दाशरथेंना औरंगाबादेत मनसे देणार नवीन जबाबदारी; राज ठाकरेंच्या सूचना!

Published On: 

औरंगाबाद: औरंगाबाद मनसेत अनेक बदल करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे(Suhas Dashrathe) यांना तडकाफडकी पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद मनसेत खळबळ उडाली असून दाशरथे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सुहास दाशरथे यांच्या या नाराजीची दखल घेत लवकरच त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असून यापुढे विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाण्याचा निर्णय मनसेने घेतला असल्याची माहिती मनसेचे जेष्ठ नेते अभिजित पानसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद दौऱ्यात औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी या बाबत निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दाशरथे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण पसरले आहे. समाज माध्यमांवर दाशरथे समर्थक राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध करतांना दिसून येत आहे.

यामध्ये चांगल्या कर्तुत्ववान माणसाची किंमत नाही तसेच नुकतेच पक्षांतर केलेल्या काहींनी या पक्षात चांगल्या लोकांना किंमत नसल्यामुळे आम्ही हा पक्ष सोडला. दाशरथे आणि खांबेकर समर्थक एकमेकांमध्ये भिडल्याचेही पाहायला मिळत आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरेंनी मुंबईत मनसे नेत्यांची एक बैठक घेतली. त्यामधे सुहास दाशरथेंना नवी जबाबदारी देण्याबाबत राज ठाकरेंनी सूचना दिल्याचे अभिजित पानसे म्हणाले. पक्षाच्या दृष्टीने हे निर्णय हिताचे ठरतील असेही पानसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!