Share

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावरून मनसेचा ‘मोदी सरकार’वर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मेलेनीया ट्रम्प भारतभेटीवर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५  फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प येणार असल्याने अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरु आहे. अधिकृत माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ असं नाव देण्यात आलं आहे.

आता मनसेने या कार्यक्रमाच्या नावावर आक्षेप घेतला असून ‘केम छो’ च का ? अशी विचारणा केली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे, ‘अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद ! आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट?”.. ‘केम छो?’.. ‘केम छो’ का?

आपली भूमिका स्पष्ट करणार आणखी एक ट्वीटही त्यांनी केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘ आमच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प गुजरातला भेट देणार आहेत आणि त्या कार्याक्रमाला ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ असं नाव देण्यात आलं आहे.  आमचा जय गुजरातला विरोध नाही. पण  महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आणि देशातील इतर राज्यांचा का विसर पडतो? मराठी ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची जास्त बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे औद्योगिक उत्पादन आणि संपत्ती तयार करणारं राष्ट्र असूनही त्याचा कायम विसर का पडतो ?असे सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केले आहेत.

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=7R-vu4aKR2k

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!