🕒 1 min read
पुणे : येत्या काहीच दिवसात महाराष्ट्र राज्यातील पुणे- मुंबईसह १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. गेल्या काही वर्षात एकूण ३४ नवीन गाव नव्याने पुणे शहरात समाविष्ट झाल्याने पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका झाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष या दोन प्रमुख पक्षातच स्पर्धा असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पण पुणे मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे मनपाच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी मनसेने प्रत्येक मतदार संघात एकतरी निरीक्षक नेमल्याची माहिती समोर येत आहे. आता पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेच पुणे दौरा करणार आहेत. शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी राज ठाकरे पुणे शहराच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे.
२०१२ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण २८ नगरसेवक निवडून आले होते. मात्र पुणे शहरात नंतर संघटनात्मक बांधणी न केल्यामुळे मनसेची घसरगुंडी होऊन नगरसेवकांची संख्या २०१७ मध्ये थेट २ वर आली. यापूर्वी राज ठाकरे यांनी १५ डिसेंबर रोजी पुणे शहराचा दौरा केला होता, या दौऱ्यामुळे पुणे शहरात मनसे मध्ये नवचैतन्याचे वातावरण तयार झाले होते. आता आगामी पुणे शहराच्या दौऱ्यामुळे पण मनसे आणखी जोरदार तयारीला लागेल यात काही शंका नाही.
महत्वाच्या बातम्या :
- IPL AUCTION 2022: दिल्लीच्या संघात पुन्हा एक वर्ल्डकप विनींग कर्णधार
- किरीट सोमय्यांचा सत्कार केल्या प्रकरणी ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल
- ‘…तर आघाडी करण्यास हरकत नाही’; एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
- गेल्या ५ वर्षात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिप्पट श्रीमंत; संपत्तीत इतक्या कोटीने वाढ
- IPL Auction 2022 : शिवम दुबेची डबल लॉटरी; चेन्नईत मिळाली जागा अन्…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
