Share

IPL AUCTION 2022: दिल्लीच्या संघात पुन्हा एक वर्ल्डकप विनींग कर्णधार

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू : IPL मेगा ऑक्शनमध्ये अंडर १९ वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार यश धुल याला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे. धुलची बेस प्राईस २० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला ५० लाख रुपयात खरेदी केले आहे.

दुसऱ्या दिवशी जेवणानंतर दिल्ली संघाने सलग बोली लावली. पंजाब आणि दिल्ली हे दोन्ही संघ यशला आपल्या संघात सामील करण्यास उत्सुक होते. अखेर दिल्ली कॅपिटल्सने या वर्ल्डकप विंनिंग कर्णधारला आपल्या संघात समावेश केला. नुकतेच वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत धुलच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले. भारताचे हे पाचवे विश्वचषक विजेतेपद ठरले. धुलने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.

यशने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. दिल्लीने याआधी पृथ्वी शॉला सुद्धा वर्ल्डकप जिंकल्यानंतर संघात खरेदी केले होते. यश धूल दिल्ली कॅपिटल्सच्याच क्रिकेट अकादमीचा भाग सुद्धा आहे. आता तो दिल्लीतूनच आयपीएल मध्ये पर्दापण करेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!