पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अमोघ वाणीने वेड लावणारे राज ठाकरे दिनांक ७ मार्च सोमवार पासून पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इतर महत्वाच्या राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे, आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी तयारीला लागणार असल्याने पुणे शहरात राजकीय चुरस वाढली आहे.
७ मार्च पासून १० मार्च पर्यंत राज ठाकरे पुणे शहराच्या दौऱ्यावर असणार आहेत. यात पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन शहरांचा राजकीय दौरा राज ठाकरे करणार आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड दौऱ्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सुद्धा पुणे शहरातील प्रसिद्ध गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन ९ मार्च रोजी असतो. यंदा प्रथमच मनसेचा वर्धापन दिन मुंबई शहराबाहेर साजरा करण्यात येणार असल्याने राज ठाकरे यांच्या या पुणे दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
मनसेने यंदा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष देण्याचे ठरवल्याने राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे यांचे ८ मार्च रोजी आगमन होणार असून ते पुणे शहरातील विविध कर्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. ९ मार्च रोजी ते गणेश कला क्रीडा मंच येथे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत. तर १० मार्चला ते पिंपरी- चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- ‘हाताची घडी अन् तोंडावर बोटाचे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’- चंद्रकांत पाटील
- सरकार तर्फे मातृवंदना योजनेत मोठा बदल! दुसरे अपत्य झाले तरी घेता येणार योजनेचा लाभ…
- राजकारणाविषयी बोलताना गडकरी म्हणाले, ‘माझ्याशिवाय कुणी येऊच नये…’
- संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; झालेल्या चर्चेतून दिला सूचक इशारा
- NAGPUR: मनपा निवडणूक तिकीटाबद्द्ल नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

