मुंबई: जनतेच्या समस्या सोडवण्याठी आपण सरकारला निवडून देतो परंतु मुख्यमंत्री हे केवळ मातोश्रीवर बसून असतात. नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत देखील ते स्वतः पाहणी करायला जात नाहीत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किसान मोर्चाच्या सभेत बोलताना केला. विमा नाही, नुकसान भरपायी नाही त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे, असेही पाटील म्हणाले.
फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा पूर परिस्थिती ओढवली होती, तेव्हा गावंच्या गावं पाण्याखाली गेली होती. त्यावेळी पाहणी करण्यासाठी मला तिथे जाताच येत नव्हते, परंतु फडणवीसांनी सांगितले की तूम्ही कसेही जा पण जा. त्यावेळी हेलिकॉप्टर घेऊन आम्ही सर्व गावांची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणजे काय हे लोकांनी पाहिले आहे. परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतीतील काही कळत नाही. मी अनेकदा त्यांना विचारलं की एकर आणि हेक्टर, एफआरपी आणि एमएसपी मधला फरक सांगा. परंतु आजपर्यंत त्यांनी मला उत्तर दिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना पहिलं पाणी, दुसरं पाणी हे शब्दही त्यांना माहित नाहीत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारमुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे.
‘आपल्या दहशतीमुळे विधानसभा तहकुब करून सरकार पळून गेलं’- देवेंद्र फडणवीस
मुंबई: भाजपा किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. मोर्चातील सहभागी लोकांकडे इशारा करत फडणवीस म्हणाले की ‘तूमची किती दहशत आहे बघा.. आज विधानभवनावर मोर्चा येणार हे माहित असल्याने विधानसभा तहकुब करून सरकार पळून गेले’. आम्हाला सरकारपुढे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे होते परंतु सरकारकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती म्हणून सरकार दोन दिवसांसाठी पळून गेले, असा आरोप देखील फडणवीसांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

