Share

पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. भाजप-राष्ट्रवादी मनसे या पक्षांनी या  मतदारसंघात जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच आता  पुणे पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठी निवडणुक घोषित करण्यात आल्या आहेत.

या ५ ही जागांसाठी ५ नोव्हेंबर रोजी नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे.तर १२ नोव्हेंबर ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे.१७ नोव्हेंबर पर्यंन्त फॉर्म मागे घेता येतील तर या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे.निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!