मुंबई : राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. ‘मी मोदीला मारू शकतो, शिवीगाळही करू शकतो’, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर भाजपाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान पुन्हा एका नाना पटोले यांनी काल इगतपुरीमध्ये आणखी वादग्रस्त विधान केले आहे.
इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. ‘ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते’, असं विधान नाना पटोले यांनी काल केलं. त्यानंतर भाजपकडून राज्यभर पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
यावर प्रकरणावर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलंवर निशाणा साधला. ते म्हणाले. “नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावं.”
महत्वाच्या बातम्या :
- “इतक खोटं करायचं कि ते उघडं नागडं होऊन समोर येतं, याचा अर्थ किरण माने चुकलेले नाही”
- “नाना पटोलेंना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवायला हवं”, चंद्रकांत पाटलांचा टोला
- उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री-अब्दुल सत्तार
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह
- “साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात”, फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

