मुंबई : आज पहाटे कार्तिकी एकादशी निमित्ताने शासकीय महापूजा अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी आषाढी राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे , कोरोनाची लस लवकर उपलब्ध होऊन जगाची यातून सुटका कर असे साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातले .
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असंही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, लॉकडाऊनला विरोध केला आहे. ‘गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको’ म्हणत आपला विरोध दर्शवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यादिवशी हे अनैसर्गिक सरकार पडेल, त्याचदिवशी राज्याला एक सक्षम सरकार देऊ – फडणवीस
- आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राचा गुजरातपेक्षा जास्त विकास केला – देवेंद्र फडणवीस
- दुष्काळ निवारणासाठी काम करणारे अभिनेते मकरंद अनासपुरेंच्या नावाची राज्यपालांकडे शिफारस!
- चीनच्या पायाखालची वाळू सरकली म्हणे…’भारताची अॅपबंदी म्हणजे जागतिक व्यापार नियमांचा भंग’
- …अन् ‘त्या’ जखमी ऊसतोड कामगारास पंकजा मुंडेंनी दिला मायेचा आधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

