मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून उद्या ही मुलाखत प्रसारित होणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आले, यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो त्यांनी आज रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे.
संजय राऊतांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच व्हायरल होत आहे. यावेळी हात धुवा सांगण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांनी काय केलं असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.
मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिले आहे. यावर त्यांनी ”ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन”, असा इशारा दिला आहे.
ऊद्या..
Tomorrow…
धमाका.. pic.twitter.com/IFTvYb1eAF— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020
दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपाने टीका केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची तक्रार केली होती. महाविकास आघाडीविरोधात भाजपा नेत्यांच्या चाललेल्या कुरघोड्या, त्यांना हात धुन्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा आदी या मुलाखतीचा मूळ भाग असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही हप्ता घेणारे आहात का? नांदगावकरांचा अनिल परब यांना सवाल
- प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी
- २६/११ : वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- ‘सामान्यांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको’, लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध
- ‘लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे’, अजित पवारांचं विठुरायाला साकडं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

