मुंबई : ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने आता टॉप ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चंडोले यांना अटक केली आहे. बारा तास चौकशी केल्यानंतर झालेली ही अटकेची कारवाई या प्रकरणातील पहिली अटक आहे.
दरम्यान, ईडीने सरनाईक यांचा मुलगा विहंगला आज चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिल्याने सरनाईक यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.चंडोले हे सरनाईक यांचे प्रवक्ता असल्याचेही समजते. तसेच आता टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप मधील आर्थिक व्यवहाराबाबत ईडी अधिक तपास करत आहे.
Mumbai: Enforcement Directorate has arrested one Amit Chandole in an alleged money laundering case related to private company Tops Security
— ANI (@ANI) November 26, 2020
मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांचे कंत्राट एमएमआरडीएकडे असून त्याचे सब कंत्राट चंडोले याच्या टॉप्स ग्रुपच्या खासगी सुरक्षा कंपनीकडे आहे. या कंत्राटातील 175 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सूत्रांकडून समजते. ठाण्यातील छाप्यात ईडीला काही कागपत्र सापडली होती त्याद्वारे चंडोले कनेक्शन उघड झाल्यानंत त्यांची बारा तास चौकशी केली गेली. टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप मधील आर्थिक व्यवहाराबाबत ईडी तपास करत आहे.
सरनाईक यांनी ईडीकड़े पत्र पाठवून पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलाविण्याची विनंती केली. यात, परदेशातून आल्यामुळे कोविड १९ नियमांनुसार ते विलगिकरणात आहे. तर विहंग याची पत्नी अनामिका यांना हायपर टेन्शनमुळे ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे विहंग तिच्या सोबत असल्याने, चौकशीसाठी हजर राहणे शक्य नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. सरनाईक यांच्या मेहुण्यामार्फ़त हे पत्र ईडीच्या अधिकाऱ्यांकड़े देण्यात आले. तसेच ईडीच्या चौकशीला पुर्ण सहकार्य करणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही हप्ता घेणारे आहात का? नांदगावकरांचा अनिल परब यांना सवाल
- आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राचा गुजरातपेक्षा जास्त विकास केला – देवेंद्र फडणवीस
- दुष्काळ निवारणासाठी काम करणारे अभिनेते मकरंद अनासपुरेंच्या नावाची राज्यपालांकडे शिफारस!
- ‘सामान्यांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको’, लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध
- ‘लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे’, अजित पवारांचं विठुरायाला साकडं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

