Share

कालचा दिवस नगरकरांसाठी दिलासादायक; जिल्ह्यात १६ मृत्यूसह ४०५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात दररोज किमान ७०० पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र काल पहिल्यांदाच दिवसभरात ४०५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कालचा दिवस नगरकरांसाठी काहीसा दिलासादायक ठरला. तर काल दिवसभरात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३७ हजार २५९ एवढी झाली असून आत्तापर्यंत ३२ हजार ४४८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ४ हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जिल्ह्यात काल ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. काल वाढ झालेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११,  नेवासा २, श्रीगोंदा ३, पारनेर ३, राहुरी १, शेवगाव १४, कोपरगाव ६, जामखेड ९, कर्जत १,  आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १३, संगमनेर ७, राहाता २, नगर ग्रामीण ४, श्रीरामपुर २, श्रीगोंदा १, पारनेर ३, अकोले ३, राहुरी १, कोपरगाव २ आणि कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत काल २७२ जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर ३६, राहाता ४०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट ५, नेवासा १२, श्रीगोंदे १५, पारनेर १७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव २०, कोपरगाव २८, जामखेड २४ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!