Share

मोठी बातमी : शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याची आमदारकी धोक्यात ?

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा उल्लेख असणारे प्रमाणपत्र नंदुरबार येथील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरविले आहे. त्रिसदस्यीय समितीने याबाबत दि. ४ नोव्हेंबर रोजी आदेश काढले असल्याची माहिती तक्रारदार माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिली. यामुळे आता लताबाई सोनवणे यांचे आमदारपद धोक्यात आले असल्याचे दिसत आहे.

जळगावातील चोपडा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. या ठिकाणाहून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लताबाई यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर समितीसमोर सुनावणी करण्यात आली. मात्र या समितीने काहीही निकाल न वळवी यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायलयाने संबंधित त्रिसदस्यीय समितीला लवकरात लवकर आदेश द्या, असे खडसावले होते.

त्यानुसार तपासणी समितीने बुधवारी (4 नोव्हेंबर) याबाबत निकाल देत लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे अनूसुचित प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. तसेच ते रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या निकालामुळे त्यांची आमदारकीचे काय? अशी चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान या निकालाविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती सोनवणे यांच्या स्वीय सहाय्यक यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!