🕒 1 min read
अमरावती : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. अनेक नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उद्धव ठाकरे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो’, अशा शब्दांत मोदी यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच आमदार रवी राणा यांनी देखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा त्यांनी शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनकडे मागणी केली आहे. ते म्हणतात, ‘संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसामुळे हाहाकार होत आहे, महाराष्ट्र संकटात सापडला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त मोठे पेकेज त्यांनी गरीब शेतकरी व शेत मजुरांना मिळेल अशी अशा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी अमरावती दौरा करावा आणि गरीब शेतकर्यांना मदत करावी’, असे ते म्हणले.
@OfficeofUT @navneetravirana @Dev_Fadnavis @Devendra_Office pic.twitter.com/YrbfbGfqvD
— MLA Ravi Rana (@mlaravirana_ysp) July 27, 2021
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी वाढदिवसा आधीच कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे होर्डिंग्ज नकोत, पर्यावरणाला हानी पोहोचेल असे काही करू नका, अस आवाहन शिवसैनिकांना केले आहे. तसेच पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्जचे पैसे सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करा, असंही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
