🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्याच भविष्याची चिंता आहे. गोरगरिब मुलांची चिंता नाही, असा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सातपुते यांनी एमपीएसीची पुस्तके हातात घेत आंदोलन केले. ही पुस्तके मी ठाकरे सरकारच्या तोंडावर मारण्यासाठी आणली असल्याचे ते म्हणाले.
‘जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं…’ असे म्हणत आमदार सातपुते यांनी विधिमंडळात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात एमपीएससीची पुस्तके होती. ही पुस्तके आपण सरकारच्या तोंडावर मारण्यासाठी आणली असल्याचे ते म्हणाले. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. महाविकास आघाडी सरकारच्या कूचकामी धोरणामुळे स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली आहे. ही हत्या नसून सरकारच्या धोरणाने केलेला खून असल्याचा आरोपही आमदार सातपुते यांनी केला.
जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं…
मी आज विधानभवनासमोर या कूचकामी राज्य सरकारच्या विरोधात व MPSC उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येचा जाब विचारण्यासाठी आंदोलन केले. #MPSC
(१/३) pic.twitter.com/7Xe7c264vJ
— Ram Satpute (@RamVSatpute) July 5, 2021
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी करत आमदार सातपुते सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, तरी देखील ठाकरे सरकारने त्या दृष्ट्रीने कोणतेच प्रयत्न केलेले नाही. आता स्वप्निलचा जीव गेल्यानंतर समिती स्थापन करण्याचे नाटक ठाकरे सरकार करत असल्याचा आरोपही सातपुते यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा कधीकाळी आवाज बुलंद करणारे नेते आज ठोस भूमिका का घेत नाहीत ?
- पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकार विरोधकांना घाबरले ?
- लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माहीचं साक्षीला खास गिफ्ट! पाहा फोटो
- दादा कोंडकेंच्या घराचा फोटो शेअर करत प्रथमेश परबने वेधले अनेकांचे लक्ष्य
- हरभजनच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ ; वाढदिवसादिवशी मिळालं खास गिफ्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

