नांदेड : जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यासाठी पिकविमा कंपन्या पंचनामे करत आहेत. मात्र, त्यासाठी १८ ते २० वर्ष वयाच्या मुलांचा वापर करण्यात येत आहे. या मुलांना कृषी क्षेत्रातील कामाचा कसालाही अनुभव नाही. तर काही विद्यार्थी हे कला शाखेचे पदवीधारक असून ते पंचनामे करत असल्याचा आरोप आमदार राजेश पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना हे पंचनामे तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात आमदार पवार म्हणाले की, ‘पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत शेती नुकसानीचे पंचनामे करतेवेळी शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक होत आहे. हे एक गंभीर प्रकरण असल्यामुळे मी सरकारला विनंती करतो की, या प्रकरणाची त्वरित चौकशी झाली पाहिजे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पंचनामे थांबवले पाहिजे. कृषी पदवीधारक किंवा अनुभवी विमा प्रतिनिधीकडूनच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे.’
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हा पूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे इथल्या शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे व्यवस्थित होणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खंजीर हा शिवसेना व राष्ट्रवादीमधील समान दुवा; भाजपचा टोला
- ‘अनंत गीतेंच्या बोलण्याने अगोदर गुदगुल्या, मग राऊतांच्या वक्तव्याने भाजपाला जुलाब’
- ‘नीट’ रद्द करण्याचा विचार नाही; सामंत यांचे स्पष्टीकरण
- सिल्लोड नगरपरिषदेत शिवसेनेचे वर्चस्व कायम; बिनविरोध पार पडली निवडणूक प्रक्रिया!
- सोमय्यांनी आधी राणे, गावित, पाचपुते या नेत्यांवर आरोप केले; आता ते भाजपमध्येच गेले – राष्ट्रवादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

