Share

खंजीर हा शिवसेना व राष्ट्रवादीमधील समान दुवा; भाजपचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. मग जर दोन कॉंग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर मग आम्ही त्यांच्या विचारांचे होणे शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार आहोत असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान यावर आता भाजपने चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ‘खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झालाय, खंजीर खुपसून शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. खंजीर हा दोघातला समान दुवा आहे.’ असा टोला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, गीते यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी हात वर केल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असं म्हणत त्यांनी गीतेंच्या वक्तव्यावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली. ‘गीते यांच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. पवार हे देशाचे नेते आहेत’, असा खुलासा राऊत यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!