🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद मनपाने दलित वस्ती सुधार निधी कामांविषयी मनपा मुख्यालयात मंगळवारी सादरीकरण केले. हे सादरीकरण पाहून आमदार प्रणिती शिंदे चांगल्याच प्रभावित झाल्या. मात्र त्यानंतर बुधवारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरलेल्या शिंदे यांनी गुलाबवाडी, जयसिंगपुरा वसाहतीत ड्रेनेजचे रस्त्यावर वाहणाहे पाणी, नळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त केला. त्यामुळे अजूनही औरंगाबाद मनपा केवळ सादरीकरणात मश्शगुल असून प्रत्यक्षात नागरिकांना कुठल्या समस्या आहेत, त्याचे सोयरसुतक नसल्याने शिंदे यांनी हा काय प्रकार आहे? असा प्रश्न करत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधिमंडळ अनुसूचित जाती समितीच्या अध्यक्षा या नात्याने काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे मंगळवारी सकाळी शहरात दाखल झाल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या रिक्त जागा, आरक्षक भरती या विविध विषयांबाबत अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीने मंगळवारी दिवसभर आढावा घेतला. त्यामध्ये दलित वस्ती निधी, सामाजिक न्याय विभागासाठी राबवलेल्या योजना, करण्यात आलेला खर्च याचा आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ आमदारांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला.
यावेळी औरंगाबाद मनपात दलित वस्ती सुधार निधी कामांविषयी सादरीकरण करण्यात आले हे सादरीकरण पाहून प्रणिती शिंदे प्रभावित झाल्या. तसेच प्रशासनातर्फे लाड पागे समिती अंतर्गत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सेवेत घेण्यात आले. पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला. अनुकंपा तत्त्वावरील पाल्यांना १००% सेवेत घेण्यात आले. २००५ नंतर महापालिका सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू केली होती.
अशी माहिती त्यांना देण्यात आली. यावर त्यांनी समाधान व्यक्त करुन आयुक्त पांडेय यांचे अभिनंदन केले. त्यानंतर बुधवारी गुलाबगाडी, जयसिंगपुरा भागात जाऊन दलित वस्ती सुधार निधीतून झालेल्या कामांची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी घरांच्या कामाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र वसाहतीमध्ये प्रवेश करण्याआधी रस्त्यावर वाहणारे ड्रेनेजचे पाट पाहून त्या चांगल्याच संतापल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुन्हा कार्यालायावर हल्ला केला तर “ईट का जवाब पत्थर से देंगे”’; भाजपचा इशारा
- ‘कोरोना काळात राज्यात ६० कंपन्यांकडून दीड लाख कोटींची गुंतवणूक’, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार आणि विरोधक मात्र दुसऱ्याच गोंधळात; शेतकऱ्यांचा संताप
- ‘महाराष्ट्राला उद्योग व उद्योजकांची गरज’-मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
