मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि सुटका या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमाला संबोधित केले आहे. एका उद्योगविषयक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर बोलणे टाळले.
कोरोना संसर्गामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्योग क्षेत्राला आश्वस्त करत म्हणाले की,’उद्योगांना कुशल मनुष्यबळ निर्माण करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. ‘उद्योग मित्र’सारखी संकल्पना आपण राबवत आहोत. हे उद्योग मित्र राज्यात गुंतवणूक कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वन विंडो सिस्टीम आपण निर्माण केली आहे. गुंतवणूकीसाठी ‘आपलेपणा’ची भावना निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे आपली अपेक्षा व्यक्त करत ते म्हणाले की,’ ‘इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात गुंतवणुकीचे आवाहन करतात. ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येऊ नये. तसेच ‘महाराष्ट्राला उद्योग व उद्योजकांची खूप गरज आहे. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे, पण समतोल साधत आपल्याला पुढं जायचे आहे. उद्योजकच महाराष्ट्राचे ब्रॅण्ड व्हावेत, त्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, यावेळी अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीय पक्षात मतभेद असतात, पण…’; बापटांनी राणेंचे कान टोचले
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

