अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राणेंमुळे पुन्हा एकदा भाजप-सेनेतील वादाचे पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर वादग्रस्त टीका करणं सोडत नाहीत. सेना-भाजपमधील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच तोफ डागली. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथून पुढे जशास तसं प्रत्युत्तर देतील, असं ते म्हणाले.
राज्यात शिवसैनिकांनी आक्रमक होत विविध शहरातल्या भाजप कार्यालयांवर हल्ले केले. कुठे दगडफेक झाली तर कुठे सेना-भाजप कार्यकर्ते भिडले. पुणे-नाशिक-अमरावतीच्या भाजप कार्यालयांवर सेनेचे कार्यकर्ते चाल करुन गेले. ‘आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर भाजप मागेपुढे पाहणार नसून ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.
दरम्यान, ‘डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना गावागावात फिरू देणार नाही’, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीय पक्षात मतभेद असतात, पण…’; बापटांनी राणेंचे कान टोचले
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार


