मुंबई : राज्याच्या औद्योगिक महागाथेचा, औद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी मुंबईत ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ चं आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यासह उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि वरिष्ठ सनदी अधिकारी सहभागी झाले होते.
कोरोनाचे संकट ओढावल्यानंतरच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या कालावधीत झाल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.
जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या राज्यामध्ये गुंतवणूक करत असून लॉकडाउननंतर राज्य सरकारने योग्य नियोजन करुन राज्याचं अर्थचक्र सुरु राहील यासंदर्भात काळजी घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच राज्यामध्ये डेटा सेंटर्स, फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून झालेली रोजगार निर्मिती याबद्दलही देसाई यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये कोरोना कालावधीत ६० कंपन्यांनी एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच ही गुंतवणूक केवळ कागदोपत्री नसून प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली आहे. ७० टक्के उद्योगांना जमिनींचं वाटप करण्यात आलं असून यापैकी एकही करार बारगळणार नाही असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांनी राणेंना डिवचले
- १२ आमदारांचा वाद निकाली लागणार? मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार आज राज्यपालांच्या भेटीला
- ‘एखाद्याने पंतप्रधान मोदींच्या कानशीलात वाजवेल असे म्हटले तर मग…?’, संजय राऊतांचा सवाल
- दिल्लीत मोठ्या घडामोडी? नारायण राणेंवरील कारवाईची ‘चाणक्य’ अमित शाह यांच्याकडून दखल
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’


