औरंगाबाद : कोरोना ( कोव्हिड – १९) रुग्ण वाढण्यासाठी मास्क न लावणारे, गर्दी करणे या बाबत आपणच जबाबदार आहोत. परंतू गुरुवारी ९०२ कोरोना रुग्णांचा आकडा गेला होता. मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये जशी रुग्ण संख्या वाढली होती. तशी पुन्हा मार्च महिन्यात जात आहे. असेच जर रुग्ण वाढत राहिले तर, आपणास गंभीर परिस्थितीला सामोरे जागे लागू शकते. असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मिडीयावरुन आवाहन केले.
कोरानाचे रुग्ण आटोक्यात आणने तसेच कमी करण्यासाठी मास्कचा नियमीत वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत, तसेच जास्त गर्दीच्या ठिकाणी वावरु नये तसेच गर्दी करु नये, सॅनेटायझरचा वापर करणे महत्वाचे आहे. कारण कोराना बाबतची सरकारने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे. तर मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खुप जण बेरोजगार झाले. व्यवसाय उद्योग देखील बुडाले आहेत. रिक्षा, वाहतुक, मजुरी देखील बंद होते. परंतू आता कोराेनाचे नियम पाळणे गरजेचे आहे.
आमदार साहेब आता तुम्ही निवेदन करता मागच्या महिन्यामध्ये आपले अनेक मंत्री महोदयांनी विकास कामांचे उद्घाटन केले, या मध्ये मंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला खुप मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा झाली होती. तसेच येथे विना मास्क घातलेले कार्यकर्ते देखील गर्दी मध्ये फिरत होते. तर आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी जर सार्वजनीक ठिकाणी गर्दी गोळा करत असतील तसेच सोशल डिन्टंसिंगचा फज्जा उडवणार असतील तर आपण काय नागरिकांना आवाहन करता ते आपल्या पक्षांतील कार्यकर्ते, नेते यांनी देखील सरकारी नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अगोदर आपल्या पक्षातील नेते, कार्यकर्ते हे कधी समजु शकतील का?
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेट दुसरा पेपर सुरळीत, ६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी दिला ऑनलाईन‘ पेपर
- शरद पवारांच्या नजीकच्या सहकाऱ्याचं निधन; फोटोसह शेअर केली भावनिक पोस्ट !
- उघड्यावर फेकत असलेला जैविक कचरा सरपंचानी पकडला
- त्या’ वेळी प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे होती – आ. अतुल सावे
- खळबळजनक! लसीकरण केल्यानंतरही २१ जण कोरोना बाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

